
नाशिक ( प्रतिनिधी ) नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता मंदिर येथे मराठा आरक्षण उप समितीचे सदस्य नामदार माणिकरावजी कोकाटे यांचा मराठा समाजाच्या वतीने भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी व समाजबंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून सत्कार सोहळा अधिक उत्साहवर्धक केला.सत्कारमूर्ती भाषणात नामदार माणिकरावजी कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित असल्याचे स्पष्ट करत सांगितले की, ते सदैव मराठा समाजाला त्यांच्या न्यायिक हक्कासाठी लढत राहणार आहेत

. मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील, तसेच मंत्रिमंडळातील सदस्य आणि मार्गदर्शक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाच्या मागण्या कायदेशीर पद्धतीने पूर्ण केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.विशेषतः, ब्रिटिश व निजामशाही काळातील गॅझेट मान्यतेप्रमाणे समाजातील सर्व पात्र सदस्यांना आरक्षणाचा लाभ देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एक गावातील एका आडनावाचा व्यक्ती जर ओबीसी प्रमाणपत्र पात्र असेल,तर त्या गावातील सर्व समाजबंधूंना त्या प्रमाणपत्राचा लाभ दिला जाईल.नामदार माणिकरावजी कोकाटे यांनी मराठा समाजाच्या उज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणे व कटिबद्धतेने कार्य करण्याचा समाजबंधूंना आश्वासन दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी केले. समाजाच्या वतीने नानासाहेबांच्या विलास पांगरकर केशवांना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक बंटी भागवत यांनी मराठा समाजाच्या नाशिक जिल्ह्याच्या पाच मागण्यांचे वाचन करून त्यांची तात्काळ पूर्तता कोकाटे साहेबांनी करण्याची मागणी केली.नितीन सुगंधी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले, तर प्रफुल वाघ्यांनी आभार व्यक्त केले. विशेष आभार मानण्यात आले की,आंदोलनाच्या काळात नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता मंदिर येथील हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच नाशिक शहर पोलीस व नाशिक ग्रामीण पोलीस यांनी आंदोलनात सहकार्य केल्याबद्दल,आणि त्यानिमित्ताने शाल व श्रीफळ देऊन नामदार कोकाटे साहेबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या सत्कार समारंभासाठी शिवाजी मोरे,विठ्ठल राजे उगले,आशिष हिरे, व्यंकटेश मोरे, प्रवीण पाटील, दीपक भदाणे, राजेंद्र निंबाळते, भारत पिंगळे, नवनाथ तांबे, डॉ. उल्हास बोरसे, सुनील गायकवाड, योगेश गांगुर्डे, रामभाऊ जगताप, शिवाजी हंडोरे, नाना शिंदे, सुदाम खालकर, बाजीराव कमानकर, मनोज ठाकरे, दादासाहेब जोगदंड, संगीताताई सूर्यवंशी, सविता वाघ, विकी गायधनी, नितीन काळे, हार्दिक निगळ, विष्णुपंत मैसधुने, सचिन पिंगळे, योगिता आहेर, बाळासाहेब जाधव, दिनकर कांडेकर आणि समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
