
नांदगाव (प्रतिनिधी)शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणाऱ्या गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्यामार्फत दिला जाणारा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीम. अनिता भगीरथ देवराज (सोनवणे) जि.प.शाळा बोराळे ता.नांदगाव जि.नाशिक यांना श्री सुरेश पवार गिरणा गौरव प्रतिष्ठान अध्यक्ष व मान्यवर यांच्या समवेत देण्यात आला.श्रीम. अनिता देवराज यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व सामाजिक बांधिलकी या भरीव योगदानामुळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रात केलेले योगदान उल्लेखनीय आहे. मागील दोन वर्षात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. ज्या शाळेत तरुण मंडळ व गावकरी कधी कोणी फिरकून ही पाहत नव्हते ते आज या शाळेला सेल्फी पॉईंट समजू लागले आहेत. एवढी सुंदर शाळा त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने बनवली आहे. एवढेच नाही तर मागील वर्षी मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा यामध्ये जि.प. शाळा बोराळे याचा तालुक्यात तृतीय क्रमांक ही मिळविलेला आहे. याविषयी श्रीमती अनिता देवराज म्हणतात, हा सन्मान फक्त माझा नसून माझे सर्व सहकाऱ्यांचा आहे माझे शिक्षक, विद्यार्थी,पालक व मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे गावातील वरिष्ठांचा सन्मान आहे. माझ्या या कामात श्री सागर साळुंके सर व श्रीम.मनीषा देवरे मॅडम यांच्या सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय मला हे करणे शक्य नव्हते. त्याचप्रमाणे गेडाम सर, फुलपगार सर,मोनाली सोळुंके मॅडम,अर्चना महाले मॅडम या सहकाऱ्यांनी वेळोवेळी केलेली मदत व सहकार्य यांच्यामुळे शाळेचा कायापालट होण्यासाठी मोठे योगदान लाभले आहे. असे कौतुकाचे बोल आपल्या सहकाऱ्यांविषयी श्रीम. देवराज यांनी बोलून दाखवले. त्यांना मिळालेल्या आदर्श साने गुरुजी पुरस्काराबद्दल मा. चिंचोले साहेब गटशिक्षणाधिकारी नांदगाव श्री कांबरे साहेब (शि.वि.अ.नांदगाव) शिरसाठ नाना (केंद्रप्रमुख वेहेळगाव) गौतमदादा पाटील (केंद्र मुख्या.वेहेळगाव) परशराम शेळके (चेअरमन शिक्षक पतसंस्था नांदगाव) तसेच शालेय व्यवस्थापन समिती बोराळे व गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक यांनी श्रीम. देवराज यांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या वेळी पंकज सोनवणे,सागर सोळुंके, मनीषा देवरे, पूजा सोनवणे, मनोज डोंगरे, विलास सोनवणे असा मित्रपरिवार उपस्थित होता. श्रीम. अनिता देवराज यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले.
