

*नांदगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरखेड येथील कृतिशील, विद्यार्थिप्रिय, उपक्रमशील शिक्षक मनोज बन्सी डोंगरे यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेऊन गिरणा गौरव प्रतिष्ठान नाशिकच्या वतीने त्यांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनी नाशिक येथील शंकराचार्य कृतकोटी गंगापूर रोड येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्व स्तरातून त्यांच्या अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
