
जिच्या पोटी माझा जन्म झाला; जिने मला हे जग दाखवलं; जिच्याकडे पाहून मी कणखरपणा शिकलो; गरिबीची लाज न बाळगता आलेल्या प्रत्येक संकटाला संधी मानून जिच्यामुळे मी लढायला शिकलो; फक्त दुसरी शिकलेली असतानाही जिच्या वाचनासह आध्यात्मिक संस्कारांकडे पाहून माझ्यातला ‘कवी रवी’ घडला….जिच्यामुळे माझ्या परिवाराने अनेक संकटं खंबीरपणे परतवून लावली… जिच्यामुळे आज मी भक्कम पायावर उभा आहे… कुठलाही गर्व न बाळगता जिने मला जमिनीवर चालायला शिकवलं… माझ्यासह माझ्या परिवाराचा पाया पक्का केला… त्या माझ्या प्राणप्रिय आईचं ७ सप्टेंबर, २००३ रोजी निधन झालं आणि आमच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु आजही जिथे-जिथे एखादा प्रश्न किंवा संकट डोळ्यासमोर येतं; अंगावर येतं, तेव्हा तिची आठवण येतेच… आनंदाचे क्षण साजरे करायला ताई आणि दादा दोघेही हवे होते… दुःखांमध्ये आणि संकटांमध्ये त्या दोघांचा धावा केला की, लढण्यासाठी हजार हत्तीचं बळ मिळतं… तिचा ‘तू खूप यश मिळव. खूप मोठा हो; पण सदैव जमिनीवर रहा…!’ हा संदेश घेऊन मी पुढची वाटचाल करतो आहे… ताई आणि दादा आज तुमची खूप आठवण येते… विनम्र अभिवादन…!_
*आई भक्तीचा सागर*आई भक्तीचा सागर/
जणू विठ्ठल माऊली तिच्या कृपाप्रसादाची/
नाही लोपली साऊलीआई शिकवी लेकाला/
जगण्याचा सत्य धडात्याच्या मार्गावर पडो/
लक्ष प्राजक्ताचा सडामुक्या प्राण्यांनाही तिने/
दिला गोठ्यात सहारास्वतः राहून उपाशी/
त्यांच्या मुखी घाली चाराधनी जाता दूरदेशी/
होते घराचा पाळणाअसा कणखर बाणा/
जणू पुरुष शहाणादिसभर राबताना/
देते कामालाच मानतिने बजाविले मला/
ठेव सदा याचे भानमोडकळीस आलेलं/
उभं केलं घरदारआजीआजोबा,मुलांना/
दिला हक्काचा आधारआई माझी वा तुमची/
नसे कधीही वेगळीसाऱ्या पोरांवर तिची/
माया सारखी सगळीआई घरात असता/
होते झोपडी महालतिच्या निघून जाण्याने/
विझे जागती मशाल…
–रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर._*
