
.ओझर ( वार्ताहर) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात शाडू मातीपासून पर्यावरण पूरक विद्यालयाच्या कार्यशाळेत बनविलेल्या गणरायाचे विसर्जन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांचे हस्ते पार पाडले. यावेळी उपमुख्याध्यापक सतीश केदार, पर्यवेक्षक दशरथ शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी विद्यालयात सत्यनारायण महापूजा संस्कृत शिक्षक हेमंत भट यांनी करून पुजेचे मानकरी श्री व सौ डांगले कुटुंबीयांनी आरती केली. विद्यालयाच्या काही सेवकांच्या पुढाकाराने शंभर सेवकांसह दोन हजार विद्यार्थ्यांना बुंदी, सत्यनारायण प्रसादासह मसालाभात महाप्रसाद जेवण देण्यात आले. क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड, उज्वला जाधव मनोरमा सोमवंशी यांचे सह सर्व सेवकांनी शिस्त व नियंत्रण ठेवून कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सांस्कृतिक समितीने कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. शालेय मंत्रिमंडळ व काही निवडक मुलांनी वाढण्याचे काम केले. विसर्जन सोहळ्यास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
