
..ओझर: ( वार्ताहर )राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत ओझर येथील बोरस्ते विद्यालयाची दहावीची विद्यार्थिनीसिद्धी योगेश गांगुर्डे हिने रावेत पुणे येथे झालेल्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून संस्थेचे नाव उज्वल केले. तृतीय क्रमांक मिळाल्याने राष्ट्रीय स्पर्धेसाठी राखीव म्हणून तिची निवड झाली होती. तिच्या या यशाबद्दल डॉ राधाकृष्णन जन्मदिन अर्थात शिक्षक दिनानिमित्त नाशिक येथे मविप्र संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक कवी पत्रकार विजय चोरमारे यांच्या हस्ते तिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे सभापती बाळासाहेब क्षिरसागर अध्यक्ष डॉ राहुल ढिकले उपाध्यक्ष विश्वासराव मोरे डॉ सयाजीराव गायकवाड ॲड संदीप गुळवे डॉ अमित बोरसे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी तिचे अभिनंदन केले आहे. क्रीडाशिक्षक प्रभाकर लवांड मनोरमा सोमवंशी उज्वला जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
