
नाशिक:-(प्रतिनिधी ) अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी शिक्षक नेहमी तत्पर असतो. आपल्या जीवनाला दिशा देत समाज जागृती आणि सुदृढ समाजनिर्मितीसाठी शिक्षकांचे सर्वात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.संदीप जगताप यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्यावतीने शंकराचार्य कृतकोटी सभागृहात आयोजित ‘साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार होते. आपल्या भाषणात प्रा.संदीप जगताप यांनी सादर केलेल्या ‘इन्स्पेक्शन’ या कवितेने उपस्थित गुरुजनांची दाद मिळवली. तसेच ज्ञानदानाच्या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून संस्काराचा आणि नव्या विचारांचा वारसा जपणारे आदर्श शिक्षक समाजाचे परिवर्तन घडवून आणू शकतात, असे उदगार मंत्रालयातील अव्वर सचिव डॉ.नंदकुमार राऊत यांनी काढले. विशेष सरकारी वकील ॲड.विद्या देवरे, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. गिरजा महिला मंचच्या सरचिटणीस भारती निकम, जिल्हाध्यक्षा शितल कुयटे, जिल्हा उपाध्यक्षा भाग्यश्री चौधरी मंचावर उपस्थित होत्या. सोमनाथ वाघ-त्र्यंबकेश्वर, प्रकाश पाडवी-सुरगाणा, मंगळू गांगुर्डे-कळवण, योगिता गावित-सुरगाणा, पाटीलबुवा माने-मालेगाव, संगीता सूर्यवंशी-देवळा, अनिता देवराज-नांदगाव, भाग्यश्री खैरनार-निफाड, मनीषा गायकवाड-दिंडोरी, सुरेश लिलके-इगतपुरी, संगीता गायधनी-नाशिक, ज्योती ठोंबरे-दिंडोरी, यमुना इम्पाळ-त्र्यंबकेश्वर, सुनंदा गवंडे-चांदवड, कावेरी दांडगे-येवला, आकांक्षा ठाकरे-सटाणा, भाग्यश्री पवार-सुरगाणा, मीनाक्षी रायते-नाशिक, निर्मला पगार-मालेगाव, मेघावती आखाडे-सिन्नर, रंजना सोनवणे-सटाणा, भारती ठाकरे-देवळा, वैशाली मिंचे-निफाड, सुमन गावडे-त्र्यंबकेश्वर, नरेंद्र पाटील-पेठ, बाबासाहेब बेरगळ-येवला, प्रदीपकुमार रसलपूरकर-नाशिक, मनोज डोंगरे-नांदगाव, उमेश बोरसे-नांदगाव, हरिश्चंद्र भोये-नाशिक, संतोष अहिरे-सटाणा, लक्ष्मण थवील-सुरगाणा, सुभाष सोनवणे-सुरगाणा, भूषण पाटील-सटाणा, उमेश जाधव-पेठ, विश्वास वाघमारे-नाशिक, पांडुरंग वाघमारे-सुरगाणा, संजय काळे-इगतपुरी, मार्तंड जाधव-त्र्यंबकेश्वर, पंकज पवार-नाशिक या शिक्षकांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक राजेंद्र दिघे, मानपत्र वाचन खंडू मोरे आणि राजेंद्र उगले यांनी पसायदान सादर केले. सविता वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. रतन पिंगट यांनी आभार मानले. युवा रंगावलीककार ॲड.दामिनी गांगुर्डे यांच्या आकर्षक रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवीदास भांगरे, देवीदास देशमुख, परशराम पाडवी, शिवाजी कोल्हे, संजय फतनानी, विश्वास सोनवणे, संजय देहाडे, मंदाकिनी शेलार, माधुरी पाटील, पूजा पवार, स्वामिनी पवार यांनी परिश्रम घेतले.
