
निगडोळ:- (प्रतिनिधी ) रयत शिक्षण संस्थेचे मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या ज्ञानसंकुलाचे मुख्याध्यापक मा.देवदत्त बोरसे यांना ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष सन-२०२५-२६ च्या आदर्श शिक्षक पुरस्काराने नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार मा.सत्यजीतजी तांबे साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले.कै.गंगाराम गोपाळराव पाटील गुरुजी यांच्या स्मरणार्थ श्री.कालिका देवी मंदिर संस्थान आयोजित या गुणगौरव सोहळ्याचे मा.सुरेशजी कोठावळे डॉ.प्रतापराव कोठावळे मा.सुभाष तळाजिया,मा.अशोकजी दुधारे यांनी सर्वांगसुंदर नियोजन केले.मा.आण्णासाहेब केशवराव पाटील अध्यक्षस्थानी होते. रयत शिक्षण संस्थेच्या ३० वर्षाच्या सेवेत देवदत्त बोरसे यांनी केलेल्या शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात केलेल्या अभिमानास्पद कार्याची नोंद घेऊन निवड समितीने त्यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड केली. सर्व मित्र परिवार,रयत परिवार, आप्तेष्ट,आजी-माजी विद्यार्थी व विद्यालयाच्या स्थानिक सल्लागर समितीचे पदाधिकारी व निगडोळ पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी या यशाबद्दल देवदत्त बोरसे सरांचे अभिनंदन केले.
