लेखक:- प्रा.सुरेश नारायणे, नांदगाव

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विकास पुरुष अशी ख्याती असलेले आणि सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे व प्रत्येकाच्या जीवनात आनंदाची झुळक निर्माण करणारे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील ताईत .धर्मरक्षक, अष्टपैलू नेतृत्व असणारे महाराष्ट्र शासन निमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) आमदार सुहास अण्णा कांदे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने –

-आ.सुहास आण्णा कांदे हे नांदगाव विधानसभेचे आमदार झाल्यापासून या मतदारसंघाचा कायापालट घडून आला . या मतदारसंघात विविध विकासाच्या गंगा आण्णांनी आणल्या व हा मतदारसंघ सुजलाम- सुफलाम करण्याच्या या एकाच ध्येयाने प्रेरित झाल्यामुळे हा मतदार संघात अनेक विकासाला चालना देऊन मतदार संघ महाराष्ट्रात आदर्श मतदारसंघ करण्याचा मानस आहे. आमदार सुहास अण्णा कांदे व सामाजिक कार्यात सतत पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अंजुमताई सुहास कांदे, व युवकांचे आशास्थान असलेले जिल्हा शिवसेना युवा नेते फरहान खान दादा यांच्या साथीने नांदगाव मतदार संघ विकास गंगेच्या वाटेवर आहे. हे श्रेय अर्थातच सुहास अण्णा कांदे आणि त्यांच्या सर्व टिमला जाते. आज युवकांपासुन जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, कृषी, रस्ते-दळण-वळण , औद्योगिक विकास प्रगती पथावर दिसत आहे.

खडकाळ -उजेड माळरान असलेला मतदार संघ गेल्या दहा वर्षांत आ. सुहास आण्णांच्या अथक प्रयत्नातुन विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकत आहे. हा चमत्कार मतदार संघाचा विकास करणे ह्या ध्येयाने आ.सुहास आण्णा प्रेरित झाल्यामुळे दिसुन येत आहे. याचा आम्हा मतदारांना अभिमान वाटतो. सुहास अण्णांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे श्रद्धास्थान आहे त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून नांदगाव मतदारसंघ आदर्श मतदारसंघ कसा होईल हाच विचार त्यांच्या मनात कायम घर करून आहे . म्हणूनच नांदगाव व मनमाडकर यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना ही पूर्णत्वास नेली आहे. तसेच धर्मवीर आनंद दिघे 78 खेडी पाणीपुरवठा योजना , गिरणा धरणातून नांदगाव शहरासाठी 55 कोटी रुपये खर्चाची छ. संभाजी महाराज समांतर नळ पाणीपुरवठा योजना आण्णांनी लोकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रथम हाती घेऊन पुर्णत्वास नेली आहे. त्यामुळे पाण्या पासून वंचित असलेल्या लोकांचे आनंद अश्रू वाहत आहेत. एवढेच नव्हे तर परिसरातील लोकांना सांस्कृतिक , ऐतिहासिक गोष्टींची ओळख व्हावी म्हणून नांदगाव शहरात जुन्या पंचायत समितीच्या जागेवर भव्य अशी शिवसृष्टी उभारुन आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख शिवसृष्टीतुन करुन देऊन नांदगावला एक नवा कायमस्वरूपी सांस्कृतिक वारसा निर्माण केला.

या शिवसृष्टी मध्ये आशिया खंडातील सर्वात उंच असा छत्रपतींचा पुतळा उभारला,तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,आदी महापुरुषांची स्मारके उभारुन त्यांच्या स्मृती जागविण्याचे महान कार्य आमदार साहेब करत आहेत, यातुनच त्यांनी राजकीय कामाबरोबरच सांस्कृतिक कार्याचा वारसा जोपासला आहे. हे दिसून येते. त्यामुळे मतदार संघातील गाव,शहरे जुनी कात टाकून नवीन झळाळी शहरांना व गावांना येत आहे. मतदार संघातील धार्मिक विकासाला चालना देण्याचा आण्णाचा प्रयत्न आहे. त्या नुसार श्रीक्षेत्र नस्तनपुर येथील शनि मंदिराला ” ब” दर्जा, शीख धर्मियांचे श्रध्दास्थान असलेले गुरुद्वाराचा विकास , श्री क्षेत्र पिनायकेश्वर येथे मंदिरापर्यंत वाहनाने जाता येणारा रस्ता, संत सावता महाराज मंदिरासाठी भव्य सभामंडप, विविध जाती धर्मासाठी मंगल कार्यालय, जातेगाव, मनमाड , नांदगाव शहरात भव्य बुध्द विहार , नांदगाव मतदार संघातील सर्व बंजारा तांड्यावर भगवान सेवालाल मूर्ती, सभामंडप, भिल्ल समाजासाठी एकलव्य भगवान मूर्ती, असे अनेक समाजासाठी समाज मंदिरे आमदार सुहास आण्णा यांनी उभारली मतदार संघातील सर्व समाज या सुविधांचा लाभ घेत आहेत. मतदार संघातील सर्व वारकरी मंडळांना टाळ,मृदुंग,विणा, भजन , किर्तना साठी लागणारे संगीत वाद्य देऊन वारकरी समुदायात नवी उर्जा आण्णांच्या या भेटीमुळे मिळाली. एवढेच नव्हे तर व्यापारी, पत्रकार, महिला वर्ग,वाहतुकदार संघ,युवावर्ग, जेष्ठ नागरिक, शिक्षक,महाविद्यालयीन युवक, या सर्व घटकांशी सातत्याने संवाद साधण्याचा अण्णांचा प्रयत्न असतो. त्यांना कुणालाही भेटायचे असेल तर सहज भेटता येते व समस्या मांडुन ती सोडवता येते त्यामुळे आ.सुहास आण्णा सर्व सामान्य नागरिकांच्या गळ्यातील ताईत कधी झाले ते समजलेच नाही. त्यांच्या या कार्यामुळे ते सर्वांचे लोकप्रिय आमदार असल्याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो.

लोकनेता कसा असावा तर आ. सुहास आण्णा सारखा साधा, सरळ, प्रेमळ, आपुलकीचा ओलावा असलेले, भावना प्रधान, सतत मदतीचा हात देणारे, मतदार संघाची काळजी करणारे आण्णासाहेब सर्वांना हवे-हवेसे वाटतात. अर्थात त्यांना साथ देणाऱ्या सौ. अंजुमताईंची साथ सावली सारखी लाभत आहे . ताईंनी देखिल सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. त्यांनी महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेतला आहे. त्या नांदगाव येथील समृध्दी बॅंकेच्या अध्यक्षपदी असुन महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मतदार संघातील जवळपास तीस हजार महिला बचत गटाच्या माध्यमातून संघटीत करुन महिलांना सक्षम बनविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. आण्णांच्या कार्यात सौ. अंजुमताई यांचा सिंहाचा वाटा आहे. आ. सुहास आण्णा कांदे आणि सौ. अंजुमताई यांच्या अथक प्रयत्नातुन नांदगाव मतदार संघात नांदगाव तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया स़ंघ मर्यादित.सुरु झाला आहे. हे शेतकरी वर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे मतदार संघ दुग्ध व्यवसायात महाराष्ट्रात आपला ठसा उमटेल. नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथे दुग्ध प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यात किमान एक लाख लिटर दूध संकलन करण्याचा मानस आहे. त्याबरोबर दुग्ध जन्य पदार्थ निर्माण करुन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल हा दृष्टिकोन या प्रकल्पाचा आहे. या बरोबरच मतदार संघातील शहरांचा विकास भविष्याच्या दृष्टीने सक्षम व्हावा यासाठी नगरविकास रचना विभागातुन आण्णांनी वित्तीय निधी उपलब्ध करून शहरातील विविध प्रभागातील रस्ते,गटारी,भूमिगत गटारी,जल वाहिण्या, विविध ठिकाणी छोटे-मोठे पुल,आदी विविध विकास कामांचा ध्यास आ.सुहास आण्णा यांनी घेतलेला आहे. त्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या नकाशावर एक विकसित मतदार संघ म्हणून ओळखला जाईल. यांचे सर्व श्रेय आमदार सुहास आण्णा कांदे आणि सौ. अंजुमताई कांदे, फरहान खान दादा, व सर्व सहकारी वर्गाला जाते हे नक्की. मतदार संघाचा विकास पाहुन नेतृत्वाने आण्णांच्या कार्याची दखल घेतली व महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या प्रमुख पदी नियुक्ती केली व त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त झाला हा आण्णांच्या या पदांमुळे प्रथमच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचा गौरवच झाला आहे. असा सेवाभाव सतत मनात असणारे, समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे, कार्यतत्पर, क्रियाशील,कलाप्रेमी, सांस्कृतिक वारसा जोपासणारे, सर्वधर्म समभाव जपणारे, राष्ट्रपुरुषांचे आदर्श जपणारे, लोकाभिमुख नेतृत्व,लहान -थोरांचे लोकप्रिय आमदार, आ.सुहास आण्णा कांदे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छातुन आण्णांच्या नेतृत्वाला नवी दिशा मिळो, राजकीय, सामाजिक जीवन यशस्वी होवो. आरोग्य व यशाची प्रार्थना करतो. आण्णा तुमच्या प्रगतीचा आलेख असाच उंच-उंच होवो. हिच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. व वाढदिवसाच्या हार्दिक- हार्दिक शुभेच्छा!!! प्रा. सुरेश नारायणे, ( नांदगाव)
