
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०२० वा दिवस* पारमार्थिक गुरूने साधकामधे संक्रामित केलेल्या ज्ञानापेक्षा अधिक उच्च आणि अधिक पवित्र असे काहीही नाही. जर एखादा मनुष्य पूर्ण योगी झालेला असेल, तर त्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती आपोआपच होते. ती ग्रंथांतून होऊ शकत नाही. तुम्ही जरी जगाचे चारही कोपरे धंडाळले किंवा हिमालय, आल्प्स, कॉकेशस हे पर्वत किंवा गोबीचे अथवा साहाराचे वाळवंट किंवा समुद्राचा तळ या सर्व ठिकाणी जरी शोध केला, तरी ते ज्ञान तुम्हाला गुरू भेटेपर्यंत कदापि लाभणार नाही.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर १५ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ६ सप्टेंबर २०२५ ★ अनंत चतुर्दशी
★ पार्थिव गणेश मुर्ती विसर्जन
★ १८८९ थोर स्वातंत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, काँग्रेस नेते, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू बॅरिस्टर शरदचंद्र बोस यांचा जन्मदिन.
★ १९२१ बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्मदिन.
★ अनंत चतुर्दशीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा. *गणपती बाप्पा मोरया…* *मंगलमुर्ती मोरया….* *पुढच्या वर्षी लवकर या…!*
