
, सोनांबे .(वसंत गोसावी बातमीदार )–सोनांबे येथे श्री गोवर्धन पतसंस्था आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शिक्षक दिनानिमित्त दिमाखात पार पडला. जनता विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय समितीचे अध्यक्ष नंदूपाटील पवार यांनी भूषवले.व्यासपीठावर डॉ. राजेंद्र गोऱ्हे, सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक पांडुरंग पवार, सरपंच प्रमिला पवार, संस्थेचे चेअरमन शरद रत्नाकर, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर धनराव, सोसायटी चेअरमन तानाजी पवार, शालेय समिती अध्यक्ष सागर पवार, केंद्रप्रमुख तानाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.सन्मानित शिक्षक जनता विद्यालय सोनांबे येथील उपक्रमशील शिक्षिका योगिता शिंदेजिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनांबे येथील उत्साही शिक्षक कांचनदास बैरागीजिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंदवाडी येथील शाळेचे संस्थापक वस्ती शाळा शिक्षक ते सहशिक्षक असा प्रवास केलेले समर्पित शिक्षक निवृत्ती पवारयांचा फेटा, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ग्रंथ, पेन व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.प्रास्ताविकात शरद रत्नाकर यांनी बदलत्या युगातील शिक्षकांची भूमिका अधोरेखित करताना, विद्यार्थ्यांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्ती, रोबो व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात शिक्षकाचे स्थान आणि महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवरील विविध सर्वेक्षणांचे निष्कर्ष याकडे लक्ष वेधले. “शिक्षकांनी या आव्हानात्मक काळात चिंतन व कृतीशीलता वाढवावी,” असे आवाहन त्यांनी केले.पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी “हा सन्मान आमच्यातील कार्यक्षमता दुप्पट करण्यास प्रेरणा देणारा आहे” अशा भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमात डॉ. राजेंद्र गोऱ्हे व पांडुरंग पवार यांनी मनोगत मांडले. दीपक भालेराव यांनी आकर्षक सूत्रसंचालन केले तर अनिल पवार यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन शंकर आव्हाड, संचालक दीपक वारुंगसे, भाऊसाहेब पवार, दशरथ पवार, देवराम डगळे, सीईओ संदीप घोडे, पतसंस्थेचे सभासद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सन्मान सोहळ्यामुळे परिसरातील शैक्षणिक वातावरणाला नवचैतन्य लाभले असून “शिक्षकांचा सन्मान हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे” असा ठसा या कार्यक्रमाने उमटविला.
