
नाशिक ( प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सेवानिवृत्त सेवकांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे सरचिटणीस मा.ॳॅड. नितीन ठाकरे यांनी केले. ते मग निवृत्त सेवक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मविप्र निवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष ॳॅड.यु.आर.जाधव हे होते. याप्रसंगी संस्थेचे सभापती मा. बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष मा. विश्वास मोरे, संचालक सर्वश्री ॳॅड.लक्ष्मण लांडगे, अमित बोरसे,विजय पगार,सेवक संचालक सी.डी.शिंदे हे उपस्थित होते. या प्रसंगी निवृत्त सेवक संघाच्या वतीने मविप्र समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मविप्र समाज निवृत्त सेवा संघाच्या 75 वर्ष पूर्ण झालेल्या 49 सभासदांचा सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस मा. ॳॅड. ठाकरे बोलताना पुढे म्हणाले की, सेवानिवृत्त सभासदांनी आतापर्यंत कुटुंबाची काळजी घेतली. आता यापुढे कुटुंबाने तुमची काळजी घ्यावी आणि स्वतःसाठी वेळ द्यावा व स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. संघाच्या ज्या महत्वपूर्ण मागण्या आहेत त्या मांगण्यांबाबत संस्थेचे कार्यकारी मंडळ सकारात्मक निर्णय घेईल. अमृत महोत्सवी सत्कारार्थींच्या वतीने माजी मुख्याध्यापक श्री. एम.एच.ठुबे यांनी मनोगत व्यक्त करून संघाच्या कामकाजाबद्दल गौरवोदगार व्यक्त केले.
त्यानंतर मूवी पण सेवानिवृत्त सेवक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेने सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. त्यामध्ये सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक साठी नवीन कार्यकारणीची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. संघाची नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे-
अध्यक्ष:- ॳॅड.यु.आर.जाधव
उपाध्यक्ष:- अशोक देवकर
सचिव:- माणिकराव गोडसे ,एल.एस.तिडके ( बाबा)
तालुका सदस्य पदी:- सुदाम आहेर ,सर्वश्री अरुण पिंगळे, दिनकर गोसावी,पी.एन.नवले- मामा, एस.एस.भामरे, विजय काकळीज, एस.वाय.जाधव,ए.आर.सोनवणे, रघुनाथ हाळदे, विजय जाधव,मोहन कणसे,जे.एन.खैरनार, तसेच महिला सदस्यपदी श्रीमती शोभा आरोटे,व श्रीमती अनिता घोलप,
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री.एस.आर.पगार यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विजय काकळीज यांनी केले.या प्रसंगी बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.
