
.पिंपळगाव बसवंत ( प्रतिनिधी ) ता.5/9/2025श्री कालिका देवी मंदिर संस्थान तर्फे शिक्षक दिनानिमित्त आयोजित कै. गंगाराम गोपाळराव पाटील (कोठावळे) गुरुजी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आज शुक्रवार दिनांक 5/9/2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता कालिका मंदिर सभागृह जुना आग्रा रोड नाशिक येथे संपन्न झाला. सौ.वैशाली शिंदे या जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव बसवंत नं 2ता.निफाड या शाळेत कार्यरत आहेत. उपक्रमशिल शिक्षिकालेखिका ,कवयित्री ,पत्रकार, स्तंभलेखिका व विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात.

त्यांचा *कलाटणी* हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन केंद्र पुणे व समग्र शिक्षा अंतर्गत *मजेमजेची गंमतगाणी* ह्या बालसाहित्याचा समावेश केलेला आहे.या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. सत्यजित तांबे आमदार (नाशिक पदवीधर मतदारसंघ) यांच्या शुभहस्ते झाला. तर माननीय श्री अण्णासाहेब पाटील (अध्यक्ष श्री कालिकादेवी मंदिर संस्था नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रम प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला हा बहारदार कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध झाला. कार्यक्रमासाठी माननीय श्री सुभाष तळाजिया (कोषाध्यक्ष श्री कालिका देवी मंदिर संस्थान) माननीय डॉ. प्रतापराव कोठावळे (सरचिटणीस श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक) तसेच माननीय श्री.अशोक दुधारे ( पुरस्कार सोहळा अध्यक्ष आयोजन समिती ) व सौ.विजया दुधारे मॅडम , मा.किशोर कोठावळे मा.आबासाहेब पवार मा.विशाल पवार मा.संतोष कोठावळे मा.सतीश कोठावळे मा.अशोक कदम मा.दीपक निकम मा.सुनील बिरारी मा.राम पाटील मा .भरत पाटील मा.अर्जुन वेलजाळी मा.आनंद चकोर मा.अविनाश वाघ यांच्या उपस्थितीत हा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.श्री कालिका देवी मंदिर संस्थान समितीने सुंदर असे नियोजन केले.
