
धडगाव. ( प्रतिनिधी राकेश पावरा )
अक्कलकुवा तालुक्यातील बारीपाडा येथील सविता माकत्या वळवी या महिलेला सर्पदंश झाला. रस्ता व पूल नसल्यामुळे नातेवाईकांना पावसात कंबरभर पाण्यातून आणि बांबूच्या झोळीतून तब्बल सात किलोमीटर प्रवास करून महिलेचे मोलगी ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

देव नदीवर पूल नसल्यामुळे दरवर्षी अशा प्रसंगी आदिवासींना जीवघेण्या अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही या गावाला रस्ता आणि पूल मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे पुन्हा एकदा तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
