
ओझर:दि.५ वार्ताहर मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालय ओझर येथील उपशिक्षक बाबासाहेब लभडे यांना शिक्षक दिनानिमित्त कालिकादेवी संस्थान नाशिक यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पदवीधर आमदार सत्यजित तांबे याप्रसंगी कार्यक्रमास उपस्थित होते. संस्थांनचे विश्वस्त अण्णासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी तांबे यांच्या हस्ते शिक्षक बाबासाहेब लभडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कालिका ट्रस्टच्या वतीने उपस्थित सर्व शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्यास बोरस्ते विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र शिंदे भाऊसाहेब रौंदळ, भालचंद्र ठाकरे, दादासाहेब सोनवणे, आत्माराम शिंदे, बाबासाहेब गायकवाड, हेमंत भट, गणेश मोरे आदि शिक्षक उपस्थित होते.
