
साकोरे (प्रतिनिधी)– रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शुक्रवार दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री. झाल्टे डी. एस. उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुंदर भाषणांनी वातावरण भारावून गेले.शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी अनेक भाषणे विद्यार्थ्यांनी दिली. शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांची, शिक्षणातील योगदानाची आणि जीवन मार्गदर्शनाची उज्ज्वल परंपरा विद्यार्थ्यांनी मनापासून व्यक्त केली.कार्यक्रमाची सांगता व समारोपाचे शब्द इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले. त्यामुळे कार्यक्रमाला एक आगळावेगळा आणि संस्मरणीय स्वरूप लाभले.
