*दि.५ सप्टेंबर २०२५..”शिक्षक दिन”माझ्या सर्व आजी-माजी शिक्षक बांधवांना,साहित्य,सामाजिक,कृषी,क्रीडा,पत्रकारिता, राजकीय,व्यवसाय,नोकरी,संगीत व अभिनय क्षेत्रातील मित्रपरिवारांना व माझ्या आजी-माजी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!*✍️प्राचार्य देवदत्त बोरसे✍️*मा.श.प.माध्य.विद्यालय निगडोळ ता. दिंडोरी जि.नाशिक.
]

देवदत्त दौलतराव बोरसे.
प्राचार्य -मा.श.प.माध्य.विद्यालय निगडोळ ता. दिंडोरी जि.नाशिक

📚 ज्ञानवारी..📚
ज्ञानियाची शब्दशेती शिक्षकाची
पेरतो बीजे सदा तो अक्षराची
रापलेल्या कोवळ्याश्या रोपट्यांना
ओल देतो प्रेमरूपी सिंचनाची
वाढली जर दुर्गुणांची रोगराई
धार देतो शिस्तरूपी औषधाची
आसवांचे बांध नयनी वाहणारे
सांधतो तो दु:खद दरी बालकांची
संकटांचा दाटला जर पूर
हृदयीभिंत होतो तोच कोमल
ज्ञानपीके काढतो काळ्या फळ्यावर
साथ घेतो त्या खडुच्या नांगरांची
कर्मयोगी शिक्षकाच्या भोवताली
दाट वस्ती बालयोगी वाचकाची
पुस्तकांना जोड देवा मस्तकांना
हीच मोठी ज्ञानवारी शिक्षणाची
✍🏼प्राचार्य देवदत्त बोरसे✍🏼 मा.श.प.माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी.जि.नाशिक.माे.नं.९४२१५०१६९५.
