
कोनांबे (: वसंत गोसावी)कोनांबे (ता. सिन्नर) येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करताना गावात एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षकांबरोबरच समाजातील लोकशिक्षकांचा सन्मान करून ग्रामविकासात योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. हा उपक्रम डॉ. आर. व्ही. गोह्रे युवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व महिला सहकारी पतसंस्था, कोनांबे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे कृषी सेलचे राज्य नेते व गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक निवृत्ती बजुनाथ डावरे उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र गोह्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुदामभाऊ डावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य केरु पाटील पवार, डॉ. आर. व्ही. गोह्रे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाघ, महिला बँकेच्या चेअरमन अर्चना डावरे, व्हा. चेअरमन रत्ना डावरे, प्रकाश डावरे, माजी सरपंच संतोष डावरे, दत्तात्रय डावरे, गंगा पाटील डावरे, सोनांबे तंटामुक्ती अध्यक्ष दामु पाटील बोडके, विष्णुपंत डावरे, उद्योजक तुषार महाजन, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक बाजीराव डावरे, अंबादास भागवत, त्र्यंबक डावरे, युवराज डावरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर डावरे, उपाध्यक्ष माधव डावरे, आशासेविका जयश्री डावरे, बाळासाहेब गुळवे, सुदाम हरीभाऊ डावरे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मानित व्यक्तींचा गौरवगावातील उत्कृष्ट तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी नाना डावरे यांना सामाजिक सलोखा जोपासून वाद सामोपचाराने मिटविण्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या प्रयत्नामुळे पोलिस ठाण्यात जाणाऱ्या तक्रारींचे प्रमाण अत्यल्प झाले आहे.कोनांबे गावचे पोलिस पाटील पांडुरंग संभाजी डावरे यांना लोककृषीशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खतांचा वापर, औषध फवारणी, जमिनीची प्रतवारी याबाबत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळविण्याचे कार्य करतात.काँग्रेस पक्षाचे राज्य कृषीसेल प्रमुख व माजी जि.प. बांधकाम सभापती निवृत्ती बजुनाथ डावरे यांना गावाच्या सर्वांगीण जडणघडणीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल उत्कृष्ट लोकशिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल जनता विद्यालय कोनांबेचे हेमंत बाळासाहेब टिळे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या रूपाली गंगाराम शिगवण यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजनया कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुदत्त ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रकाश डावरे यांनी केले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य संतोष सुदाम डावरे यांनी केले तर आभारप्रदर्शन माजी सरपंच संतोष बाळू डावरे यांनी मानले.या अनोख्या उपक्रमातून कोनांबे गावाने शिक्षक आणि लोकशिक्षक या दोन्ही घटकांचा मान राखला. गावाच्या विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व मान्यवरांचा एकत्रित सन्मान करून गावकऱ्यांनी सामाजिक ऐक्याचे व शिक्षणप्रेमाचे उदाहरण घालून दिले.
मान्यवरांचे विचार
डॉ. राजेंद्र गोह्रे यांनी सांगितले – “गावाच्या प्रगतीत शिक्षक आणि लोकशिक्षकांची समान भूमिका आहे. एक वर्गात ज्ञान देतो तर दुसरा समाजात संस्कार रुजवतो.”
सुदामभाऊ डावरे यांनी मत व्यक्त केले – “कोनांबे गावाने लोकशिक्षकांना सन्मानित करून समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे.”तर
अध्यक्षीय भाषणात निवृत्ती बजुनाथ डावरे यांनी म्हटले – “गावातील सलोखा, शेतकऱ्यांचा विकास व मुलांचे शिक्षण या त्रिसूत्रीवरच खरा ग्रामविकास उभा राहतो. आजचा कार्यक्रम त्याचेच प्रतीक आहे.”
