
मूळ डोंगरी (प्रतिनिधी )सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळडोंगरी,ता.नांदगाव या शाळेत भारताचे दुसरे राष्ट्रपती *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन* यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर *शिक्षक दिन* म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान.श्री.एस.जी.राठोड साहेब सचिव श्री.सिद्धांत दादा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापिका सौ. बोरसे एस. एस. मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार, सहशिक्षक श्री.बोरसे आर.टी.सरांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत 5 वी ते 10 वी च्या वर्गांना अध्यापन केले व शिक्षक दिनाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यार्थी मुख्याध्यापक, बळीराम चव्हाण व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यार्थी शिक्षिका मोरे अमृता व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थी शिक्षकांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर वैचारिक प्रकाशझोत टाकला.विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प व पेन देऊन शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक सागर चव्हाण व समाधान राठोड यांनी केले.आभार प्रदर्शन विद्यार्थी शिक्षिका रुपाली आव्हाड ने केले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष,सचिव, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
