
नांदगाव (प्रतिनिधी ) आज कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना+2 स्तरच्यावतीने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ‘शिक्षक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी शिक्षकांनी वर्गवार वेळापत्रकानुसार अध्यापन करून शिक्षक कर्तव्यांचाअनुभव घेतला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे यांनी आपल्या अध्यक्षिय मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी सुसंस्कारांची आवश्यकता असते.शाळा-महाविद्यालयांमधून शिक्षक निरंतर विद्यार्थ्यांना सुसंस्कार देण्याचे कार्य करीत असल्यामुळे विद्यार्थी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात प्राप्त केलेल्या सुसंस्कारांची अभिव्यक्ती सार्वजनिक जीवनात आपल्या सद् वर्तनातून करण्याचे आवाहन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे कला व वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख.प्रा.बोरसे सर, प्रा पवार सर यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले.

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी तनिष्का परदेशी, विशाखा शिरसाठ, साक्षी सौंदाणे, ओम गुडेकर,तन्वी परदेशी शारदा सातपुते व वैष्णवी गोटे इ.विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सदर प्रसंगी मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एम.राठोड, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.पी.एम. आहेर,प्रा.जी.बी.पिसाळ, प्रा.एस.आर.जाधव, प्रा.जी.के. बेंडकुळे, प्रा.जी.बी.देशमुख,प्रा. श्रीमती एस.ए.लोखंडे, प्रा. श्रीमती फापाळे, प्रा.श्रीमती आहेर, प्रा.सायली बोरसे, विद्यार्थी प्राचार्या विशाखा शिरसाठ,विद्यार्थी उपप्राचार्या साक्षी सौंदाणे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचा सत्कार करून आपली कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.आदिती खैरनार, सूत्रसंचालन कु. तनुजा उगले,आभार प्रदर्शन कु. साक्षी सरोदे या विद्यार्थिनींनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.सी. पैठणकर यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व ग्रंथालयातील शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.
