
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०१९ वा दिवस* गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय आत्मसन्मान नाही, गुरुशिवाय शिक्षण नाही. जीवनविद्या प्राप्त करुन अत्युच्च पद गाठण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. भारतात गुरुमहिमा अनादी काळापासून अपरंपार मानला गेला आहे. शिक्षणाचा अर्थ नुसता माहीतीचा संग्रह करणे, ज्ञान मिळविणे असाच जर असता तर, मग ग्रंथसंग्रहालये जगातील सर्वात मोठे आचार्य (शिक्षक) व ज्ञानकोश सर्वात मोठे ऋषी ठरले असते. मनुष्य निर्माणाच्या कार्यात गुरुची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षकाच्या दैनिक सामान्य कार्याचा अनुभव आणि शिष्याच्या दृष्टीतून जगाकडे पाहण्याची शक्ती हे अत्यंत आवश्यक गुण शिक्षकाच्या अंगी असावेत, शिक्षणशास्त्राच्या प्रत्येक सिद्धांतातून हेच सत्य प्रतिपादित केले गेले आहे. *स्वामी विवेकानंद…*

●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर १४ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ५ सप्टेंबर २०२५ ★ ईद-ए-मिलाद
★ ओणम
★ १८८८ भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती, थोर तत्त्वज्ञ, शिक्षकतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन त्यांच्या गौरवार्थ संपूर्ण भारतात शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
★ समाज उन्नतीसाठी सतत कार्यरत राहून युवापिढीतून ज्ञानाधिष्टित समाज घडवून देशाच्या सर्वांगीण विकासात बहुमोल योगदान देणाऱ्या समस्त आचार्यांप्रती, गुरुजनांप्रती, शिक्षकांप्रती कृतज्ञता, साष्टांग दंडवत. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
