
.नाशिकरोड ( प्रतिनिधी)दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर काॉलेज,नाशिक.या शाळेत आज गुरुवार दि.०५/०९/२०२५ रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी तथा शाळेचे उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर व मा.श्री मिलिंद कोठावदे सर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.उपमुख्याध्यापक श्री राजेंद्र सोमवंशी सरांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांच्या कार्याची व शिक्षकांच्या भुमिकेचे महत्त्व कथन केले.पुढे त्यांनी….
तु अपनी खूबियां ढूंढ
कमियां निकालने के लिए
लोग हैं न…

असे संदेशपर सुंदर विचार काव्यातून व्यक्त केले.
पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे मँडम,गव्हर्निंग कौन्सिल सदस्या सौ.भारती चंद्रात्रे मँडम,सौ.दिपाली ठाकूर मँडम,श्री विजय सरोदे सर,सौ.रुपाली जोशी मँडम यांनी आजच्या शिक्षक झालेल्या विद्यार्थिनींनीची पाठाचे निरिक्षण केले.व त्यांचे अनुभव सांगून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापिका म्हणून कु.प्रेरणा पाटील हिने तर उपमुख्याध्यापिका कु.पायल तळेकर हिने भुमिका पार पाडली.यावेळी शिक्षक झालेल्या विद्यार्थिनींनी काही गंमतीशीर अनुभव सांगितले.आणि शिक्षकांचे खरे महत्त्व आज आम्हाला कळले,असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे मँडम उपमुख्याध्यापक श्री राजेंद्र सोमवंशी सर व श्री मिलिंद कोठावदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.लता शिंदे मँडम व सौ.मिनाक्षी दोंड मँडम यांच्या नियोजनातून त्यात सर्व शालेय पदाधिकारी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होऊन विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन कु.अक्षरा गायकवाड हिने केले.

कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मँडम,अधिक्षिका मा.सौ.मीना वाळूंजे मँडमयश यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी उपमुख्याध्यापक श्री. राजेंद्र सोमवंशी सर,ज्युनिअर काँलेजचे उपमुख्याध्यापक श्री. मिलिंद कोठावदे सर,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे मँडम,गव्हर्निग कौन्सिल सदस्य श्री.कैलास बागुल सर,सौ.भारती चंद्रात्रे मँडम,शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिंनीनी उपस्थित होते.फलकलेखन सौ.सायली मुळे यांनी केले.
