
निगडोळ:-रयत शिक्षण संस्थेचे मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयात ५ सप्टेंबर हा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठ शिक्षक एन.जे.कापडणीस यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.इ.१०वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत इ.८ वी ते १०वी च्या वर्गांना अध्यापन करून शिक्षक दिनाचा आनंद घेतला.ऋतुजा वाघ,पंकजा गायकवाड,स्वप्निल गोडसे,कादंबरी मालसाने,सिद्धी कामाले,समृद्धी सोनवणे इ.विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली.विद्यार्थ्यांनी आपली मनोगते सादर केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी.,जेष्ठ शिक्षक एन.जे.कापडणीस व पी.व्ही.गायकवाड मॅडम यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर वैचारिक प्रकाशझोत टाकला.विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन पंकजा गायकवाड व समृद्धी सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवरे व्ही.ए व भामरे टी.व्ही.यांनी अनमोल सहकार्य केले.
