
रोहिले (प्रतिनिधी ) श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित माध्यमिक विद्यालय रोहिला येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका सौ. जे . एस.जाधव मॅडम यांची निवड करण्यात आली तसेच प्रमुख अतिथी म्हणून ए . बी. कटारे सर यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी श्री सोनवणे सर यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीमती पठाण मॅडम यांनी शिक्षकांच्या गौरवा खातर शिक्षकांवर सुंदर असे गीत सादर केले. कार्यक्रमाच्यl अध्यक्ष सौ जाधव मॅडम यांनी अध्यक्षीय भाषण केले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाविषयी त्यांनी विस्तृत माहिती दिली. तत्पूर्वी दिवसभर उत्स्फूर्तपणे विद्यार्थी शिक्षकांनी शालेय कामकाज बघितले डी के. जाधव सर यांनी आभार व्यक्त केले अशा पद्धतीने कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
