
मनमाड -( प्रतिनिधी): येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दर वर्षी ५ सप्टेंबर हा दिवस डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस हा शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापीका धात्रक पी. जि.होते विद्यार्थी मुख्याध्यापक योगराज नगे आणि सर्व शिक्षकवृंद व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय वेळा पत्रकाप्रमाणे तासिका घेत अध्यापन केले.नृत्य ,नाटक सादर करण्यात आले.एका दिवसाचे शिक्षक झाल्यानंतर अध्यापन करत असतानाचे त्यांना आलेले अनुभव आपल्या मनोगतातून सांगितले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त करत सर्व विदयार्थी व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत जीवनात शिक्षकाचे स्थान किती अमूल्य आहे याचे महत्व सांगत शिक्षकांनी दिलेल्या अनुभवाची शिदोरी घेऊन जीवनात नक्की यशस्वी होत येईल असे प्रतिपादन केले.शिक्षक दिनाच्या निमित्ताने

विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व गुरुजनांचा पेन व पुष्प देवून सन्मान केला.यावेळी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ठ अध्यापन केलेल्या विद्यार्थ्याला आदर्श शिक्षक म्हणून निवड करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी नम्रता पाटील,अनुष्का गिते यांनी केले..कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
