
.नांदगाव (प्रतिनिधी), दि.4 सप्टेंबर 2025, दि. 1 व 2 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक जिमखाना नाशिक येथे क्रीडा व युवक संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी नासिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा पातळीवरील टेबल टेनिस स्पर्धेत, नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मेडीयम स्कूल या शाळेच्या चौदा वर्षाखालील, सतरा वर्षाखालील व एकोणीस वर्षाखालील टेबल टेनिस खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत जे टी. कासलीवाल इंग्लिश मेडीयम शाळेतील 14 व 19 वर्षा आतील मुलींनी विस्डम हायस्कूलचा अंतिम सामन्यात पराभव केला. त्याचप्रमाणे 17 व 19 वर्षाखालील मुलांनी अनुक्रमे डीपीएस स्कूलचा व विस्डम हायस्कूल चा अंतिम सामन्यात पराभव करून विशेष यश संपादन केले.या चारही टेबल टेनिस संघाची धुळे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या सर्वांना क्रीडा शिक्षक अशोक बागुल सर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच संघव्यास्थापक म्हणून शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सौ. रिटा उबाळे यांनी काम पाहिले.संस्थेचे चेअरमन श्री. सुनिलकुमार कासलीवाल, खजिनदार श्री. विजुभाऊ चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, सुशिलकुमार कासलीवाल, श्री. जुगलकिशोर अग्रवाल,रिखबचंद कासलीवाल महेंद्र चांदीवाल, प्राचार्य श्री मनी चावला, मुख्याध्यापक श्री. गोरख डफाळ, श्री.विशाल सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विजेत्या खेळाडू मुलामुलींचे खुप कौतुक व अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
