
मुळडोंगरी (प्रतिनिधी ) सरस्वती माध्यमिक विद्यालय व मुळडोंगरी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*29 ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी संपूर्ण भारतात *राष्ट्रीय क्रीडा दिन* म्हणून साजरा करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिन हा विविध देशांमध्ये राष्ट्रीय क्रीडा संघ आणि त्या देशांच्या क्रीडा परंपरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी,येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री एस्.जी.राठोड साहेब व श्री सिद्धांत दादा राठोड अध्यक्ष स्थानी लाभले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे एस्.एस्. मॅडम उपस्थित होत्या. तसेच सहशिक्षक श्री.पगार एस्.एस्. सर यांनी मेजर धनंजय यांच्या जीवनप्रवासाबद्दल मोलाची माहिती दिली. व क्रीडा शिक्षक श्री बोरसे आर्.टी.सर यांनी मैदानी खेळांचे महत्व पटवून दिले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
