
मखमलाबाद विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना माजी सेवक संचालक प्रा.डॉ. अशोकराव पिंगळे व उपस्थित सर्व मान्यवर
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती “शिक्षकदिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सेवक संचालक प्रा.डॉ.अशोकराव पिंगळे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे,माजी सेवक संचालक प्रा.नानासाहेब दाते,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष पैलवान वाळू काकड उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य संजय डेर्ले,कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मनीषा आहेर,अभिनवचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे, विद्यालयाचे उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे, जूनियर कॉलेज प्रमुख प्रा. विकास थोरात उपस्थित होते. सुरुवातीस एनसीसी आर्मी व नेव्हल पथकांद्वारे प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले.सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन,डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीतमंचाने अतिशय सुंदर असे ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला तसेच सर्व शालेय परिवाराला शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक संजय हांडगे यांनी सर्व अतिथींचा परिचय आपल्या ओघवत्या शैलीत अतिशय सुंदर असा करून दिला.प्राचार्य संजय डेर्ले यांनी सर्व अतिथींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच अतिथिनी व्यासपीठावरील सर्व गुरुजनांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.कु.आराध्या काकड हिने इंग्रजी मधून तर कु.देवयानी भोये हिने हिंदी व मराठी मधून अतिशय सुंदर असे आपले मनोगत व्यक्त केले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली.शिक्षक दिनानिमित्त मखमलाबाद मविप्र शैक्षणिक संकुलातील ज्येष्ठ कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे, सुधीर तांबे,ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अनिल पगार,विज्ञान शिक्षिका योगिता रोडे,जुनिअर कॉलेज प्रा.रूपाली तांबे,अभिनव बाल विकास मंदिरच्या शिक्षिका अश्विनी पवार,हिराबाई पाटील, कनिष्ठ लिपिका मोहिनी खुटे, यशश्री मोरे,ड्रायव्हर सचिन नवले,विनायक कोकाटे, सेविका ज्योती भामरे या सर्वांचा आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी म्हणून मान्यवरांच्या शुभहस्ते शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.माजी सेवक संचालक प्रा.नानासाहेब दाते यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शैक्षणिक कार्य यावर आपले मनोगत व्यक्त केले.शिक्षक दिनानिमित्त त्यांनी मविप्र शैक्षणिक संकुलातील सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मखमलाबाद शैक्षणिक संकुलाचे सर्व प्राचार्य,मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक,प्राध्यापक,शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना शिक्षक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.माजी सेवक संचालक प्रा.डॉ. अशोकराव पिंगळे यांनी आपल्या मनोगतात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली.त्यांनी शाहू,फुले,आंबेडकर यांचे विचार मांडले.छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंग व त्यांचे कार्य हे आपल्यासाठी अतिशय मौलिक असून या व्यक्तींच्या विचारांना आपण गुरु मानले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.वाचनाने माणसे परिपक्व होत असतात त्यामुळे कायम वाचन करावे.मविप्र संस्थेच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला.शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग करणे अत्यंत गरजेचे आहे.शिक्षक दिनानिमित्त मविप्र शैक्षणिक संकुलातील सर्वांना त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या ७८ विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून त्यांनी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना अतिशय छान शिकवून ज्ञानदानाचे कार्य केले.यामध्ये कु.आकांक्षा कोलते,कु.सुप्रिया राय यांना आदर्श विद्यार्थी शिक्षिका व कु.राम गडाख यांना आदर्श सेवक म्हणून प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.शिक्षक दिनानिमित्त कु.देवयानी भोये,कु.श्रावणी मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच विद्यार्थी शिक्षक बनलेल्या कु रसिका वायचळे,कु.श्रावणी भालेराव,कु.साहिल डगळे,कु. रिया पवार,कु.ईशांत म्हैसधुणे, कु.दर्शन सांगळे कु.पूजा कापसे,कु.आयुष पिंगळे कु.आकांक्षा कथार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे,सुनिता उशीर,कु. उत्कर्षा बांगर,कु.रोशनी गांगुर्डे यांनी व आभार प्रदर्शन उपप्राचार्य रावसाहेब उशीर,कु.साक्षी चित्तारे यांनी केले.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमास प्राचार्य संजय डेर्ले,कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मनीषा आहेर,अभिनवचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे, जूनियर कॉलेज प्रमुख प्रा. विकास थोरात,शालेय पंतप्रधान कु.आकांक्षा कथार,उपपंतप्रधान कु.आयुष पिंगळे,सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
