
ओझर: दि.५ वार्ताहर मराठा विद्या प्रसारक समाज संचालित माधवराव बोरस्ते विद्यालय ओझर येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार सर पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. प्रास्ताविक शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थी व शिक्षिका श्रीमती कातकाडे यांनी मनोगत व्यक्त केले.फलक रेखाटन कलाशिक्षिका मोनाली निकम यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र डेरले यांनी केले.
