
जळगाव निंबायती (वार्ताहर) – येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारून इतर विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे कार्य पार पडले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थीनी प्राचार्या कुमारी आकांक्षा अहिरे होती. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे होते. ऐसमवेत विद्यार्थीनी पर्यवेक्षिका कुमारी प्रगती नायनोर वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सद्दाम अन्सारी, विद्यालयाचे प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, प्रा. पी. जी. माने, एस. टी. जाधव, पी. यू. शिंदे, सी. डी. राजपूत, सांस्कृतिक विभाग प्रमुख डी. एस. जमधाडे, प्रा. अमोल अहिरे, प्रशांत देवरे, ए. व्ही. अहिरे, योगेश ठोके, सुदय बोरसे, दिपक बोरसे, शारीक अन्सारी लेखनिक आर. के. शिंदे, निसार शेख, बी. जी. दुकळे प्रदिप पाटील, योगिता आहिरे यांच्यासह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

प्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी जेष्ठ प्रा. पी. जी. माने यांना गिरणा गौरव प्रतिष्ठानचा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शिक्षकांची भूमिका करतेवेळी आलेला अनुभव साक्षी दुकळे, निकीता कोळपे, डिंपल सरोदे, रिंकू कऱ्हे, गौरी कांबळे आदी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जीवनकार्याचा आढावा घेऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्तविक उन्नती देवरे हिने केले, सूत्रसंचालन प्रतिक्षा माने हिने केले तर आभार ऋतुजा साळुंके या विद्यार्थींनीने मानलेत.
