
जीवन गौरव -गीता चौधरी
सिन्नर (प्रतिनिधी) :आदिवासी युवा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने यंदाचा आदर्श शिक्षक तसेच लोकनेते माणिकराव कोकाटे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा भव्य पुरस्कार सोहळा येत्या रविवार, दि. १४ सप्टेंबर रोजी सिन्नर येथे दिमाखात पार पडणार असून या सोहळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे पुरस्कार वितरण क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे.

जीवन गौरव -एकनाथ खैरणार
गेल्या आठ वर्षांपासून शिक्षक दिनाचे औचित्य साधून फाऊंडेशनतर्फे हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. लोकनेते माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे आदिवासी समाजासाठी असलेले मोलाचे योगदान लक्षात घेऊन दरवर्षी सेवानिवृत्त शिक्षकांना “जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करण्याचा निर्णय फाऊंडेशनने घेतला आहे.यंदाच्या *जीवनगौरव* पुरस्कारासाठी सौ. गीता वसंत चौधरी (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका), श्री. एकनाथ आनंदा खैरनार (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) व श्री. गंगाधर आप्पाजी कोरडे (सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक) यांची निवड करण्यात आली आहे. *आदर्श मुख्याध्यापक* पुरस्कारासाठी श्री. एस.टी. पांगारकर व श्री. सलीम लतीफभाई चौधरी यांची निवड झाली आहे. *क्रीडा क्षेत्रातील* पुरस्कारार्थींमध्ये श्री. अनिल ढवळा झडे, पैलवान प्रवीण पंढरीनाथ पाळदे, श्री. माणिक तबाजी गीते, श्री. योगेश वाळू शिंदे, श्री. दशरथ लक्ष्मण मेंगाळ, श्री. भाऊसाहेब वामनराव सानप व श्री. संभाजी रंगनाथ मुन्तोडे यांचा समावेश आहे. *आदर्श शिक्षक पुरस्कार* श्रीमती स्मिता अशोक पाटोळे, श्री. उत्तम मुरलीधर भोये, श्री. गोरक्षनाथ अर्जून गरड, श्री. दिपक भालेराव, श्री. विकास गुंजाळ, श्री. बबन डगळे, श्रीमती सोनाली खालकर, श्रीमती सुरेखा शेळके व श्री. अंकुश सहाणे यांना प्रदान केला जाणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यामुळे शिक्षक, क्रीडापटू व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळून समाजातील गुणवत्ता विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास अध्यक्ष विठ्ठल खोकले, सचिव पांडुरंग मेंगाळ, संस्थापक देवराम खेताडे, शरद लहांगे, जनार्दन खेताडे, विक्रम कवटे व अनिल जाधव यांनी व्यक्त केला आहे.
