
सिन्नर (प्रतिनिधी):मातोश्री चांडक कन्या विद्यालय, सिन्नर येथे पालक-शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त “ज्ञानदीप सन्मान” या उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्यालयातील ३४ शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उल्लेखनीय कार्याचा “ज्ञानदीप सन्मानचिन्ह” देऊन गौरव करण्यात आला. सर्वप्रथम ढोल ताशाच्या गजरात लेझीम पथकाने शाळा प्रवेशद्वारापासून स्वागत करत सर्व शिक्षकांवर गुलाब व झेंडूच्या फुलाची उधळण करत कार्यक्रम स्थळी आणले यांनतर सर्व शिक्षकाचे औक्षण करण्यात आले सरस्वतीपूजन ,ईशस्तवन ,स्वागतगीत घेत कार्यक्रमाची सुरवात करण्यात् आहे सिद्धी देशमुख हिच्या नृत्य आविष्कारातून उपस्थिताची मने जिकंली यावेळी शाळा समिती अध्यक्ष श्री.श्रीराम क्षत्रिय याचा विशेष सन्मान तसेच शिक्षक दिनानिमित्त सहभागी इयत्ता १० वीच्या 50 विद्यार्थिनींना पेन आणि गुलाबपुष्प देऊन पालक-शिक्षक संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले

.कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. सुनीता कर्डीले होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. गोरक्ष सोनवणे, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे ,सचिव राजहंस माळी ,सहसचिव जयश्री सोनवणे, खजिनदार दीपक गायकवाड सहखजिनदार कोमल लहाने ,ज्येष्ठ शिक्षिका माधुरी कुलकर्णीआदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम उपक्रमासाठी खास देणगीदार म्हणून श्री. पोपट इलग व चेतन पाटोळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनीता कर्डीले यांनी शिक्षक हा ज्ञानाचा सुंदर झरा असून मेहनत करा यश नक्की मिळेल असा संदेश देत पालक शिक्षक संघाने केलेल्या गौरव सोहळ्याचे विशेष कौतुक करत सेवा कारकिर्दीतला प्रथमच इतका सुंदर सोहळा पाहण्यास मिळाला अशा भावना व्यक्त केल्या तर शाळेच्या पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे यांनी आपल्या मनोगतात सुंदर सोहळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सहभागी विद्यार्थिनीचे विशेष कौतुक केले यावेळी माधुरी कुलकर्णी ,तृषाली बोडके , सुनील कुऱ्हे, स्मिता क्षत्रिय यांनी तर विद्यार्थिमधून अमोली जाधव,प्रीती दास,भैरवी कमानकर,स्नेहल कोटकर आदिनी मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाचे प्रास्तविक पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे यांनी तर सुंदर सूत्रसंचालन रेश्मा जहागीरदार यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील कुऱ्हे यांनी केले.यावेळी पालक-शिक्षक संघाचे सदस्य राजेंद्र पाबळे, सुनील कुऱ्हे, पोपट इलग, सचिन गोळेसर, गुलाब कांदे, गायत्री कर्नाटकी, सविता ठोक, स्मिता क्षत्रिय, सुरेखा पाटील, कावेरी गुंजाळ, मंजुषा आहेर, माया सोनवणे, रेखा वाघ, रेश्मा जहागीरदार, रोहिणी करंजकर आदी उपस्थित होते.सन्मानित शिक्षकवर्ग:सुनीता कर्डीले, सुवर्णा सोनवणे, उत्तम भोये, राजहंस माळी, दीपक गायकवाड, अलका वाघ, उमा लोकरे, वैशाली दातीर, मंगेश जाधव, तृषाली बोडके, कुसुम सोनवणे, संयुक्ता कुलकर्णी, सुवर्णा बांबळे, नीलिमा दुसाने, रवींद्र आसवले, रेश्मा कडतन, संध्या कुलकर्णी, प्रिया कुलकर्णी, मनीषा उकाडे, सुरेखा जेजुरकर, माधुरी कुलकर्णी, सोनाली मोरे, कांतीलाल कासार, ज्योती डोंगरे, संगीता पवार, कल्पना पारखे, हरिओम भडांगे, गंगाराम उघडे, अनिता मुळे, अरुणा जमधाडे, भगवंत भोये.पालक-शिक्षक संघाच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून “ज्ञानदीप सन्मान” हा उपक्रम शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करणारा, प्रेरणा देणारा आणि विद्यालयाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरला आहे.
