
नाशिक (प्रतिनिधी)स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी.जे.चौहान माध्यमिक विद्यालय मोरवाडी येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती दिन व शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अपेक्स संस्थेचे संस्थापक श्री संदीप कर्पे ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी, पर्यवेक्षक कीर्तीकुमार गहाणकरी, विद्यार्थी मुख्याध्यापिका आर्या पास्ते, विद्यार्थी पर्यवेक्षक ऋत्विक दांडेकर व्यासपीठावर उपस्थित होते पाहुण्यांच्या परिचयानंतर विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये प्रणाली कानगुडे, रक्षिता नागरे, समृद्धी सोनवणे ,गायत्री निकम, गौरी नखाते, राधिका आव्हाड व सार्थक हिवाळे या विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या मनोगतातून पाहुण्यांनी शिक्षक हा दीपस्तंभासारखा असतो व आधुनिक तंत्रज्ञान शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त साधन आहे. मात्र त्याची संयमाने वापर करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले मुख्याध्यापिकांनी सन्माननीय अतिथींचे विद्यालयातर्फे आभार मानले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सृष्टी शिंदे यांनी करून दिला तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री हिरे यांनी केले या सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.
