
नाशिक (प्रतिनिधी) ना.जि.मराठा विद्या प्रसारक समाज निवृत्त सेवक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी ठिक दुपारी १.०० वाजता ना.जि.म.वि.प्र.समाज निवृत्त सेवक संघ, नाशिक चे अध्यक्ष ॳॅड.यु.आर.जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रावसाहेब थोरात सभागृह, गंगापुर रोड, नाशिक -२ येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सभेत सुरवातीला ना.जि.मराठा विद्या प्रसारक समाज निवृत्त सेवक संघ, नाशिक मधील अहवाल काळात वयाची ७५ वर्षं पूर्ण केलेल्या जेष्ठ सभासदांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सन.२०२५-२०२६ ते २०२९-२०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी निवृत्त सेवक संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. तरी सभासदांनी सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन सचिव माणिकराव गोडसे यांनी केले.
