
इस्लामपूर (मोहन राठोड , प्रतिनिधी) किनवट तालुक्यातील मौजे तल्हारी तांडा येथे गणेश विसर्जन सोहळा आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी पारंपारिक पद्धतीने उत्साहात आणि भक्ती भावाने साजरा करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या सजावटीत आणि भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बाप्पांना निरोप देण्यात आला गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी पारंपारिक पद्धतीने विसर्जनांची तयारी करण्यात आली होती गावातील महिला पुरुष तरुण लहान मुलं आणि मंडळांचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले संपूर्ण गावात जल्लोष यांचे वातावरण होते अनेकांनी बंजारा समाजातील पारंपारिक नृत्य सादर करत बापांचा निरोप घेतला मिरवणुकी दरम्यान पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांच्या मदतीने शिस्तबद्ध व्यवस्था राखण्यात आली होती विसर्जन स्थळी सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेण्यात आली होती या सोहळ्यांच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते युवक मंडळ आणि ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य चे सहकार्य लाभले बाप्पांना निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले मात्र पुढच्या वर्षी पुन्हा जल्लोषक बाबांची स्वागत करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला
