
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०१८ वा दिवस

आपण कर्माविषयी सदा असंतोष प्रकट करीत असतो त्याचे कारण म्हणजे आपण सर्वजण स्वतःला फार थोर समजत असतो, हे होय. परंतु मनापासून व प्रामाणिकपणे कर्म करू लागताच अगदी क्षुद्र कर्तव्येही चांगल्या रीतीने पार पाडण्यास आपण किती असमर्थ आहोत हे आपल्याला उमजते, आणि त्यायोगे स्वतःसंबंधी आपण ज्या साऱ्या मोठमोठ्या कल्पना उराशी बाळगून होतो त्या मग स्वप्नासारख्या विरू लागतात. आमची कर्तव्य मुख्यतः आमच्या भोवतालच्या एकंदर परिस्थितीने ठरत असतात. कर्तव्यांमध्ये लहान मोठे काही असू शकत नाही फलासक्त कर्मीच आपल्या वाट्याला आलेल्या कर्तव्याविषयी कुरकुर करीत असतो. निष्काम अनासक्त कर्मयोग्याच्या दृष्टीने सर्वच कर्तव्य समान होत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १३ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ४ सप्टेंबर २०२५
★ वामन जयंती
★ १८२५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, राजकीय, सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेत निवडून जाणारे पहिले भारतीय नेते, भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्मदिन.
★ १८८२ थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात.
★ १९४१ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्मदिन.
