
*ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन:- ईगतपुरी व त्रंयबकेश्वर तालुक्यातील हद्दीवरील ईगतपुरी तालुक्यातील बोरीची वाडी (शेवगेडांग ग्रा.प.) येथुन एक जिवंत बिबटया पकडला गेला आहे. बोरीची वाडी येथील एका गावठी कोंबडीच्या शेडमध्ये संरक्षणासाठी लावलेल्या जाळीत हा बिबटया अडकला होता.. मसाळ नावाचे व्यक्तीचे हे गावठी कोंबडीचे शेड आहे. दरम्यान पहाटेच्या सुमारास शिकारीसाठी आलेल्या या बिबटयाने शेड मध्ये शिरुन बर्याच गावठी कोंबडया फस्त केल्या. शेड मधुन बाहेर निघण्याच्या प्रयत्नात हा बिबटया शेडच्या संरक्षण जाळीत अडकुन पडला. पहाटे हा प्रकार लक्षात येताच नागरिकानीं तातडीने त्रंयबकेश्वर वनविभागास याची सुचना दिली. या सुचनेनंतर त्रंबकेश्वर वनविभागाचे वन परिक्षेत्र आधिकारी देवकर, निंबेकर आदीचें सोबतीने वन कर्मचार्यानीं घटनास्थळी धाव घेऊन या जिवंत बिबटयास पकडले आहे. दरम्यान वैतारणा धरणाचे परिघात ईगतपुरी व त्रंयबकेश्वर या दोन्ही तालुक्यातील अनेक गावांमधून बिबटयाचे दर्शन व त्याचेकडुन पाळीव जनावरांवर हल्ल्याचे प्रकार वाढते आहे. वन विभागाने या जंगली प्राण्याचां बंदोबस्त करावा अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी केली आहे. हया परिघात बहुसंख्य करुन आदिवासी समाजाची वसती आहे.हा समाज छोटे छोटे पाडे, वाडयामध्ये राहणे पसंत करतो. निसर्गप्रिय समाज असल्याने जंगलानजीक व विरळ अशी यांची वसती असते. जंगली श्वापदाचें मुक्त संचारामुळे या भागात भीती पसरली आहे.
