
सोलापूर ( प्रतिनिधी) : दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) जिल्हा शाखा कर्णिक नगर सोलापूर येथील निवासी अंधकार्यशाळेला आता सुशीलकुमार शिंदे दिव्यांग (दृष्टीबाधित) निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र असे नाव देण्यात आले आहे. या नामांतराचा कार्यक्रम माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त उद्या गुरुवारी (ता. ४ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता कर्णिक नगर येथे होणार आहे.या वेळी .हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर . यांच्या हस्ते नामकरण सोहळा पार पडणार असून .नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश यलगूलवार . व .बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी . प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अधीक्षक .रामचंद्र कुलकर्णी . यांनी दिली.नॅब संस्थेने यासाठी पूर्वी प्रस्ताव पाठवला होता. शासनाने त्यास मान्यता देऊन सोलापूरच्या विकासावर आणि दिव्यांग सेवेवरील शिंदे यांचा विश्वास व कार्याचा गौरव केला आहे. हे नामकरण केवळ एक औपचारिकता नसून दिव्यांग सेवेसाठी कृतज्ञताप्रदर्शन आणि आदर्श समाजभावनेचे प्रतीक ठरणार आहे, असे संस्थेचे जनरल सेक्रेटरी के. डी. पाटील यांनी सांगितले.
