
न्यायडोंगरी (प्रतिनिधी) परधाडी तालुका नांदगाव येथील वि. का. से. सह.सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन याची निवड नांदगाव येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयात मोठ्या खेळीमेळीत , शांततेत व बिनविरोध पार पडली.ठरलेल्या रोटेशन पद्धतीचे पालन करून मागील चेअरमन व व्हा चेअरमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर *चेअरमनपदी सौ.प्रमिला पुंडलिक निकम* तर व्हा *चेअरमनपदी श्री कल्याण रंगराव पवार* यांची एकमताने बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून “औरतकर” तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विठोबा दिवटे यांनी काम पाहिले या प्रसंगी नांदगावच्या सहाय्यक निबंधक सौंदाणे मॅडम तसेच पारधाडी सोसायटीचे सर्व सन्माननीय सदस्य गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
