
लोहोणेर येथील जनता विद्यालयाने देवळा तालुकास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सवात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करताना तालुका विज्ञान अध्यापक राजेंद्र कापडणीस, बागुल सर, दळवी सर समवेत मार्गदर्शक शिक्षक सुनिल एखंडे, सचिन रौंदळ, अविनाश मोरे आणि सहभागी विद्यार्थी (छाया-सुनिल एखंडे)
लोहोणेर (प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांच्या अभिनयातून उलगडला डिजिटल सक्षमीकरणाचा आवाज व डिजिटल साक्षरतेचा संदेश* लोहोणेर-: लोहोणेर येथील मविप्र समाज संस्थेच्या जनता विद्यालयाने वाजगाव येथे झालेल्या देवळा तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर झेप घेतली. नेहरू विज्ञान केंद्र वरळी व राज्य विज्ञान संस्था रवी नगर नागपूर यांच्या वतीने विद्यार्थी व समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवा व विज्ञानाच्या अवघड संकल्पना नाट्याच्या स्वरूपात अधिक सोप्या भाषेत समजाव्या या उद्देशाने दरवर्षी विज्ञान नाट्य महोत्सवाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात येते. सदर नाट्य स्पर्धेत देवळा तालुक्यातील १८ शाळांनी सहभाग नोंदवला.विद्यालयाच्या नाट्य चमूने ‘मानव कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या मुख्य विषयांतर्गत ‘डिजिटल भारत जीवन सक्षमीकरण’ या उपविषयावर आधारित ‘लॉगिन टू डिजिटल भारत’ ही विज्ञान एकांकिका अत्यंत प्रभावीपणे सादर केली.नाटिकेतून विद्यार्थ्यांनी आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने डिजिटली सक्षम होणे का आवश्यक आहे हे ठळकपणे दाखवले. मोबाईल बँकिंग, डिजीटल पेमेंट, आधार कार्ड, ई-शासन सेवा,डिजीटल शिक्षण,ऑनलाइन आरोग्य सुविधा, शेतकऱ्यांसाठी डिजीटल शेती मार्गदर्शन अशा अनेक उपयुक्त सेवांचे महत्त्व सादर केले. तसेच डिजीटल माध्यमांचा योग्य वापर केल्यास समाजातील प्रत्येक घटक आत्मनिर्भर, पारदर्शक व प्रगतिशील कसा होऊ शकतो हे स्पष्ट केले.या नाटिकेत खुशी बोरसे निवेदक व शिक्षिका,अनुष्का दशपुते सरपंच, श्वेता शेवाळे बंड्या, गुंजन शेवाळे पोस्टमन, अनुष्का गवळी शेतकरी,अक्षदा सुर्यवंशीसुशिक्षित तरुण,नंदिनी बागुल सुशिक्षित तरुणी,सई सोनवणे मंगल काकू आदी भूमिका साकारल्या.यावेळी तालुका विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष राजेंद्र कापडणीस, राकेश निकम, परीक्षक बागुल सर, दळवी सर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.सदर नाटिकेचे दिग्दर्शन, लेखन व मार्गदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले तर नेपथ्य रचना, रंगभूषा व वेशभूषा सचिन रौंदळ,अविनाश मोरे यांनी केली.तसेच पार्श्व संगीत वैदही एखंडे आणि सोहम सुर्यवंशी यांनी दिले. विज्ञान शिक्षक दौलत पवार, ए.टी.शेवाळे, शशिकांत ठाकरे,अनिता पाटील,ज्योती पाटील,माधुरी भामरे,गायत्री आहेर,स्वाती भामरेमनिषा गिरासे,साधना साळुंखे आदींचे सहकार्य लाभले.या यशाबद्दल मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार,माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश आहिरे,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष दिपक देशमुख,माता पालक संघ उपाध्यक्ष सविता देशमुख तसेच सर्व समिती सदस्य आदींसह मुख्याध्यापिका के.ए.शिंदे, उपमुख्याध्यापक एन.आर. ठाकरे, पर्यवेक्षक व्ही.एम.निकम यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. *
: गेल्या सलग चार वर्षांपासून विद्यालयाच्या नाट्य चमूने या विज्ञान नाट्य महोत्सवात विविध विषयांवर एकांकिका सादर करत प्रथम क्रमांक मिळवत विजयाचा चौकार मारला आहे.
सुनिल एखंडे(सांस्कृतिक समिती प्रमुख तथा दिग्दर्शक)
