
सिन्नर (प्रतिनिधी):मातोश्री चांडक कन्या विद्यालय, सिन्नर येथे शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर अभिमानास्पद घटना घडली आहे. विद्यालयातील परिश्रमी व गुणवंत शिक्षकांनी यंदा राज्य व तालुका पातळीवरील शिक्षक सन्मान पटकावून विद्यालयाचा मान उंचावला आहे.विद्यालयातील श्री. उत्तम भोये यांची निवड आदिवासी युवा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य तर्फे “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – 2025” साठी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची ही दखल आहे. तसेच विद्यालयातील

श्री. राजहंस माळी व

सौ. अलका वाघ यांना मुख्याध्यापक संघ तर्फे “तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – 2025” जाहीर झाला असून त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाचा हा सन्मान आहे.या विशेष यशाबद्दल शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. गोरक्ष सोनवणे, मुख्याध्यापिका सौ. सुनिता कर्डिले, पर्यवेक्षिका सौ. सुवर्णा सोनवणे, सहसचिव सौ. जयश्री सोनवणे, खजिनदार दिपक गायकवाड, सहखजिनदार कोमल लहाने यांसह विद्यालयातील सर्व शिक्षकवर्ग व पालक-शिक्षक संघाचे सदस्य राजेंद्र पाबळे, सुनील कुऱ्हे, पोपट इलग, सचिन गोळेसर, गुलाब कांदे, गायत्री कर्नाटकी, सविता ठोक, स्मिता क्षत्रिय, सुरेखा पाटील, कावेरी गुंजाळ, मंजुषा आहेर, माया सोनवणे, रेखा वाघ, रेश्मा जहागीरदार, रोहिणी करंजकर आदींनी तिन्ही शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले
