
नाशिक : (प्रतिनिधी )मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत नाशिक जिल्ह्यात सकल मराठा समाजाने जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. जिल्ह्यातील विविध भागांत या विजयाचा गुलाल उधळत मराठा समाज बांधवांनी आनंदोस्तव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला नाशिक मधील समाज बांधवांनी ग्रामदैवत कालिकामातेची आरती करून समाजबांधवांनी पेढे वाटले आणि फटाक्यांच्या रोषणाईत सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता शैक्षणिक व नोकरीमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याकारणाने राज्य सरकारचे कौतुक करत मराठा समाजाने अभिनंदन याचा प्रस्ताव यावेळी ठेवत तो सर्वांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आला.मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच मराठा आरक्षण उपस समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील व समितीत असलेल्या सर्व मंत्री महोदय यांनी घेतलेले निर्णय हे समाजाच्या अपेक्षांनुसार आणि संघर्षाला न्याय देणारे ठरले आहेत.मराठा बांधव आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे मा.श्री.मनोजदादा जरांगे-पाटील यांच्या व मराठा समाजाच्या अनेक वर्षाच्या लढ्याला यश मिळाल्याने जिल्ह्यातील सर्व स्तरातील मराठा बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णयहैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय.सातारा खंडपीठ महिनाभरात लागू करण्याचा स्वतंत्र GR.मराठा व कुणबी एकच असल्याचा निर्णय,तांत्रिक बाबी तपासून जलद गतीने घेतला जाणारसर्व आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा निर्णयआंदोलनात बलिदान दिलेल्या सर्व आंदोलकांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णयमुंबईत आंदोलकांच्या वाहनांना करण्यात आलेला दंड संपूर्ण माफ करण्याचा निर्णय.दिलेल्या सर्व आश्वासनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे या सर्व निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत.आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांना गती देण्यात येणार आहे.नाशिक शहरासह जिल्ह्यातील गावागावांत आज सकल मराठा समाज एकत्र जमला होता.नाशिक शहरातील सर्व सकल मराठा समाज बांधवांनी नाशिकच्या ग्रामदैवत कालिकामातेची ती करत फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना मिठाई वाटली.सर्वत्र जय जिजाऊ “जय शिवराय” एक मराठा लाख मराठा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले.सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले.त्यावेळी हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर,नानासाहेब बच्छाव, विलास पांगरकर,केशव अण्णा पाटील, नितीन सुगंधी,राजू देसले,आशिष हिरे, प्रफुल वाघ,डॉ रुपेश नाठे,राम खुर्दळ, योगेश गांगुर्डे,प्रवीण पाटील,भारत पिंगळे,योगेश कापसे,राम पाटील,विकी गायधनी,नितीन काळे,राजेंद्र शेळके, नितिन खैरनार,आणील आहेर,संदीप हांडगे,ममता शिंदे,रेखा जाधव,रागिनी आहेर,रोहिणी उखाडे,अमोल शिंदे, किरण पानकर,महेंद्र बेहरे,ज्ञानेश्वर कवडे,आदी सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी ज्या पद्धतीने सारथी शिक्षण संस्था कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यासाठी सातत्याने प्रयत्न करून त्या माध्यमातून अनेक मराठा समाजातील मुलांना नोकरीत व व्यवसायात पुढ आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले त्याच पद्धतीने आता मंजूर केलेल्या मागण्या सुद्धा कायमस्वरूपी टिकवून मराठा समाजाला न्याय देतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे सरकारचे अभिनंदन करतो तसेच मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी सुद्धा सरकारने योग्य ते प्रयत्न करून न्याय द्यावा.
करण गायकर – राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा.
