
नाशिक( प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये लाडक्या गणपती बाप्पाला पर्यावरण पूरक निरोप देण्यात आला.परंपरेनुसार गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर सातव्या दिवशी आरती पूजा व नैवेद्य करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! या गजरात शालेय परिसर दुमदुमला होता.गणपती विसर्जन म्हणजे केवळ मुर्तीला निरोप नाही,तर आपल्यामध्ये आलेली श्रध्दा, भक्ती,एकता आणि आनंद या पुढेही टिकवून ठेवण्याचा संकल्प करुन लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.विसर्जनाच्या या दिवशी सर्व विद्यार्थी व पालक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते.या विसर्जनाचे सुंदर फलक लेखन रुपाली शेडगे यांनी केले.शालेय गितमंच यांनी देखील विविध गणपती बाप्पाच्या निरोपाची गाणे सादर केली.बाप्पाच्या या विसर्जनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक आदी सहकार्य लाभले.
