
. नांदगाव (प्रतिनिधी)..हुतात्मा चौकातील अतिक्रमण काढावे यासाठी माजी नगरसेविका अक्काबाई सोनवणे यांचे आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी मागे..नाशिकच्या नांदगाव मधील हुतात्मा चौकातील शासकीय विश्राम गृहाजवळ व परिसरातील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून या महामार्गावरुन अवजड वाहने तसेच छोटे मोठे वाहनांची रेल चेल असते.याच रस्त्याने शालेय विद्यार्थी येजा करतात, शहरातील सर्वात जास्त गर्दीचा हा चौक असतानाही संबधीत प्रशासन या कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्या यांनी केला होता.रस्त्याच्या कडेला व्यापलेली फूटपाथ, ठेले, बेकायदेशीर शेड्स आणि पार्किंगमुळे चौक अक्षरशः कोंडीचा बळी ठरत असल्याने हुतात्मा चौकातील अतिक्रमण काढावे या साठी माजी नगरसेविका अक्काबाई सोनवणे यांनी नांदगाव पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले असून आज दुसऱ्या दिवशी शासकीय विश्राम गृह या परिसरातील अतिक्रमण काढण्यात आल्याने पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मध्यस्थीने सुरू असलेले उपोषण अखेर आज सोडविण्यात आले.रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिल्याने संबंधित अधिकारी यांनी या उपोषणाची दखल घेत तत्काळ अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
