
सिरोचा ( प्रतिनिधी मुरलीधर मारगौनी ) सिरोंचा जिल्हा गडचिरोली.सामान्य शेतकरी गोड्या पाण्यात मोतीची ही शेती केली जात आहे गोदावरीच्या सुपीक काठावर फक्त कापूस, मिरची आणि धानच नासामान्य शेतकरी गोड्या पाण्यात मोतीची ही शेती केली जात आहे ही, तर गोड्या पाण्यात मोतीचीही शेती केली जात आहे.

जिल्हा मुख्यालयापासून २२० किमी अंतरावरील सिरोंचा येथे रवी बोंगोनी हे गत तीन वर्षापासून मोत्याची शेती करीत असून, त्यांना यातून आर्थिक उत्पादनही मिळत आहे. केवळ पारंपरिक शेती न करता अधिक उत्पादन घेणारी शेती करावी यासाठी रवी बोंगोनी यांनी मोती संवर्धन करण्याचा पर्याय निवडला. यासाठी शेतातील ०.२० हेक्टर आर. जागेवरील खड्डा खडून त्यात त्यांनी मोतीसंवर्धन केले. रवी यांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी बोलून मोती संवर्धन सुरू केले. पहिल्या वर्षी त्यांना ५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. शिंपल्यांची खरेदी, जाळे, यासह विविध वस्तूंवर त्यांना खर्च आला. १५ ते १६ महिन्यांत त्यांना दुप्पट उत्पादन मिळाले. कंपनीच्या प्रतिनिधींना पैसे दिले गेले तर ते मोती लागवडीसाठी आवश्यक असलेले सर्व मोती, जाळी इत्यादी पुरवतात. कंपनीचे प्रतिनिधी अनेकदा मोती लागवडीच्या पद्धतीचा आढावा घेतात आणि शेतकऱ्यांना आवश्यक सल्ला आणि सूचना देतात. एकदा पीक हातात आले की ते ते खरेदी करतात अशी माहिती रवि बोगोंनी यांनी दिली आहे.
