
मालेगाव 🙁 प्रतिनिधी )राज्याचे माजी शिक्षणमंत्री स्वर्गीय डॉ. बळीराम हिरे यांच्या सुविद्य पत्नी आणि भाजपचे नेते प्रसाद हिरे यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराताई बळीराम हिरे यांचे आज सायंकाळी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 86 वर्ष होते. त्यांच्या पश्चात चिरंजीव प्रसाद हिरे, कन्या डॉ. सौ. सुचेता अशोक बच्छाव, डॉ. नीता शुक्ल, सुन सौ. गीतांजली हिरे, नातू चि. प्रणवदादा हिरे, नात चि. कु. प्रांजली दिदी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा *गुरुवार* दिनांक *४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता* “इंद्रप्रस्थ ” कॉलेज रोड, मालेगाव कॅम्प येथून निघेल. त्यांचा अंत्यसंस्कार डॉ. बी. व्ही. हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर गोळीबार मैदान मालेगाव कॅम्प येथे स्वर्गीय डॉ. बळीरामजी हिरे यांच्या समाधीस्थळी करण्यात येईल.
