
नासिक (प्रतिनिधी)= सर्व साहित्यिक प्रतिष्टीत, नामवंत व सुजाण आहेत, समोर बसलेल्या साहित्यिक यांनी समाजाला योग्य व चांगली दिशा देणारे साहित्य निर्माण करावे अशी अपेक्षा जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी व्यक्त केलो. साहित्य रंग, साहित्य मंच नासिक आयोजित “” साहित्य महोत्सव 2025 “” चे उदघाटन करताना सुहास टिपरे हे पुढे असे म्हणाले कि, साहित्यिक हा निरपेक्ष असला पाहिजे. समाजातील प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडली पाहिजे. जाती धर्मा च्या संकुचित भिंती तोडून मानवता वादी विचारांचे अस्तित्व निर्माण करणे ही काळाची गरज आहे असे शेवटी म्हणाले. या कार्यक्रम चे मुख्य आयोजक विजय पाटील परभणी व संयोजक सुशीलकुमार शिंदे हे होते. ओझर येथील आजीचे हॉटेल येथे झालेल्या भव्य संमेलन चे अध्यक्ष जेष्ठ कवियत्री सौं सुनंदा पाटील यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं कि पैशानी भौतिक सुखे मिळतात पण साहित्य अशी देणगी आहे कि त्यातून सर्वांगीन प्रगती होते प्रखर वेदने शिवाय साहित्य निर्माण होत नाही वेदना उमटली तर साहित्य जिवंत वाटते. कार्यक्रम अध्यक्ष स्वाती संजय सोनवणे यांनी त्यांच्या भाषणात साहित्याचा वसा पुढे नेण्यासाठी सांगून सर्व कवी यांचे कौतुक केलें. तर प्रमुख पाहुणे माणिक राव गोडसे यांनी त्यांच्या भाषणात साहित्य टिकवावे व वाढवावे असे सांगितले.उच्च शिक्षण घेऊन, उच्च शिक्षण बरोबर व्याख्यान, लेखन, कायदा व समाज सेवेची आवड असलेले व सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेलं सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व सुशीलकुमार देवराम शिंदे याना जळगाव चे जेष्ठ कवी प्रकाश बारी व जेष्ठ साहित्यिकl इंदिरा जाधव यांनी माना ची पगडी, सन्मान चिन्ह व सन्मान पत्र, शाल पुष्प देऊन सन्मान केला. कवी संमेलन मध्ये महाराष्ट्र तील कवी कवियत्री यांनी भाग घेऊन संमेलन रंगत गेले त्यातून उत्कृष्ट काव्य प्रथम विजेते किरण तायडे तर दुसरा क्रमांक सोनाली चव्हाण, तृतीय सम्राघ्यानी सूर्यवंशी, चौथा संदीप गवारे यांनी पटकवला उत्तजनार्थ अक्ष्यता पाटील यांना मिळाला. गायन स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक गायत्री गवारे तर दुसरे दिगम्बर गाडे यांना मिळाला विविध 11 मान्यवर यांस सन्मान करण्यात आला.कार्यक्रम सूत्रसंचालन कल्पना जाधव यांनी केलें.अश्विनी सांगळे, वैशाली सोनवणे चित्रा शिरनामे व सुशीलकुमार शिंदे, व विजय पाटील परभणी यांनी मोलाचे सहकार्य केलें.
