
नाशिक ( प्रतिनिधी ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर संचालित, साहित्य रंग, साहित्य मंच ,नासिक आयोजित साहित्य महोत्सव 2025 श्री. सुशील कुमार शिंदे आयोजक होते .तसेच श्री.सुहास टिपरे यांनी उदघाटन केले .ज्येष्ठ साहित्यिका सौ. सुनंदा साहेबराव पाटील संमेलनाध्यक्ष होत्या . एकूण ४०कवींचा सहभाग होता .गायन स्पर्धेत ५ जणांनी सहभाग नोंदवला होता. संमेलनाध्यक्ष सौ.सुनंदा ताई पाटील यांनी सांगितले की पैशांनी भौतिक सुखे मिळतात पण साहित्य अशी देणगी आहे की त्यातून सर्वांगीण प्रगती होते .साहित्यिक लेखणीच्या नांगराने शेती करतो. प्रखर वेदनेशिवाय साहित्य निर्माण होत नाही .वेदना उमटली तर ते साहित्य जिवंत वाटते. साहित्यिकाने कोशात व दबावाखाली न राहता मनाला भिडणारे साहित्य निर्माण करावे.श्री .माणिकराव गोडसे प्रमुख पाहुणे होते. सौ स्वाती सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
