
सोनांबे (वसंत गोसावी बातमीदार ): सोनांबे येथील भूमिपुत्र आणि सिन्नर महाविद्यालयाचे प्रा. संजय सुकदेव पवार यांना तेजस बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. संभाजीनगर येथील डॉ. मौलाना आझाद संशोधन केंद्रात नुकत्याच झालेल्या भव्य सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री मेघा डोळस व कवी सुभाष सोनवणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रा. पवार यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मेडिकल लॅब टेक्निशियन या कोर्सविषयी उत्सुकता निर्माण केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. तसेच त्यांनी साहित्य क्षेत्रातही सक्रिय राहून अनेक पुस्तके लिहून आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. याच कार्याबद्दल त्यांना हा बहुमान मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

सिन्नर येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. पवार यांचा सन्मान होताच संस्थेचे सरचिटणीस अँड. नितीन ठाकरे, संचालक कृष्णाजी भगत, प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील, उपप्राचार्य प्रा. आर. व्हि. पवार, प्रा. एस. पी. शेलार, प्रा. गिरीष गुजराथी, प्रा. सुनिल भागवत, प्रा. गणेश पाटील, प्रा. जयंत महाजन, प्रा. कैलास काळे, प्रा. देवराम ढोल, प्रा. आर. टी. सोनवणे, श्री. बाळासाहेब डावरे, प्रा. दत्ता वेळजाळी यांसह सिन्नर सह्याद्रीचे संचालक श्री. सुदाम शिंदे, श्री. मधुकर डावरे, विद्यार्थी व ग्रामस्थांनी हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव केला. सिन्नर महाविद्यालयाचे वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे मिळालेला हा साहित्य भूषण पुरस्कार सोनांबेकरांसह सिन्नर तालुक्यासाठी अभिमानाचा ठरला आहे.
