
न्यायडोंगरी (प्रतिनिधी) येथील आश्रम शाळेत “जनजाती” गौरव दिवस उत्साहात साजरा.शासनाचे मार्गदर्शक सूचना नुसार आज दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी, श्री शनेश्वर सेवाभावी संस्था संचलित स्व. अण्णासो गंगाधर शिवराम आहेर अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, न्यायडोंगरी (ता. नांदगाव) येथे “जनजाती गौरव दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून जनजातींच्या संस्कृती, परंपरा आणि गौरवशाली वारसाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच चित्रकला स्पर्धा व रंगोळी स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता व कलागुण सादर केले.

